काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे ते नेहमीच वादात असतात. सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध होत असतो. दरम्यान आता राहुल गांधींचं सावरकरांनाविषयी असलेलं मतासंदर्भात सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली आहे. तसंच त्यांनी राहुल गांधींना सल्ला सुद्धा दिला आहे.