
Bollywood Entertainment News : फॅमिली मॅन, असुर या वेबसिरीजमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता शरीब हाश्मी नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. संगी असं त्याच्या आगामी हिंदी सिनेमाचं नाव आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर शेअर करण्यात आलं. शरीबबरोबर महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरेही स्क्रीन शेअर करणार आहे.