

saba pataudi on islam
ESAKAL
बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर आणि लोकप्रिय क्रिकेटर मन्सूर अली खान यांची प्रेम कहाणी एकेकाळी चांगलीच गाजली होती. त्यांचं लग्न आंतरधर्मीय होतं. त्यामुळेच त्याची आणखी चर्चा झाली. त्यानंतर त्यांना सबा, सैफ आणि सोहा अशी तीन मुलं झाली. या तिघांपैकी दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला आहे. मात्र लग्नानंतर शर्मिला टागोर यांनी इस्लाम स्वीकारलेला ही गोष्ट अनेकांना ठाऊक नव्हती. शिवाय त्यांनी त्यांच्या मुलांनादेखील त्याच धर्माची शिकवण दिली असं त्यांची मुलगी सबा हिने एका मुलाखतीत सांगितलंय. मुलं धर्माच्या बाबतीत गोंधळून जाऊ नये म्हणून तिने असं केलं असल्याचं सबाने सांगितलं.