
छोट्या पडद्यावरून स्वतःची ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शर्मिष्ठाने 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली. 'चि आणि चि. सौ. का' या चित्रपटातही ती दिसली. ती अभिनेत्री असण्यासोबतच एक निर्मातीदेखील आहे. तिने झी मराठीवरील अनेक कार्यक्रमांची निर्मिती केलीये. तिची नवी मालिका 'तारिणी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वी तिची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय. त्यावरून तिला प्रचंड ट्रोल केलं जातंय.