
Bollywood Latest Update: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडत असलेली शर्वरी आता आलिया भट्ट सोबत स्क्रिन शेयर करणार आहे.दोघेही या चित्रपटात सुपर एजंटची भूमिका साकारत आहेत. YRF स्पाय युनिव्हर्स प्रोजेक्ट अल्फा मध्ये शर्वरी सुपरस्टार आलिया भट्ट सह दिसणार आहे. (Sharvari Wagh Latest News)
आपल्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शर्वरीने आपल्या चाहत्यांना माहीती दिली आहे.अल्फा च्या सेटवरचा तीचा आणि दिग्दर्शक शिव रवैलचा फोटो तिने शेयर केला आहे.
यावेळी या फोटोच्या खाली लिहीलं आहे की, "यापेक्षा मोठं काहीच नाही! आज माझ्या #Alpha प्रवासाची सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक आहे! विश्वास ठेवा... मी या क्षणाची कल्पना केली आहे खूप तयारी केली आहे पण पोटात फुलपाखरं जाणवतात... तुमच्या विश्वासासाठी धन्यवाद आदि सर आणि @shivrawail (शिव रवैल) तुमचा माझ्यावर विश्वासासाठी!
यापूर्वी, शर्वरीने YRF स्पाय युनिव्हर्स सारख्या सुपरस्टार ने भरलेल्या फ्रँचायझीचा भाग बनण्यासाठी आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, "या YRF स्पाय युनिव्हर्सचा भाग बनणे खूपच रोमांचक आहे. मी सध्या ऊर्जेने भरलेली आहे - या संधीसाठी खूप उत्सुक आहे - आपल्या देशातील सुपरस्टार्सपैकी एक आलिया भट्टसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे."(Spy Film ALFA )
ती पुढे म्हणाली, "या युनिव्हर्सचा भाग बनणे, ज्यामध्ये माझे सिनेमाई आदर्श आहेत, हे खरोखरच स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. फक्त या तथ्यामुळे की मी सिनेमा जगतातील महान आयकॉनच्या या गॅलक्सी मध्ये एक सुपर एजंटची भूमिका निभावतेय, हे खूपच अद्भुत आहे."
शर्वरी निखिल आडवाणी यांच्या पुढील चित्रपट वेदा मध्ये दिसणार आहे, जो १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. ती या चित्रपटात वेदाची भूमिका साकारत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.