अभिनेता शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने सामाजिक प्रश्नांवर भाष्य केलय. अनेक सेलिब्रिटी राजकीय तसंच सामाजिक प्रश्नांवर बोलत असतात. रस्ता, त्यावरील खड्डे, ट्राफिक, तसंच अनेक चुकीच्या गोष्टीवर व्हिडिओ शेअर करत सेलिब्रिटी आपलं मत मांडत असतात. अशातच आता शशांक केतकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याने परखडपणे मतं मांडली आहे.