प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाल हिच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जातेय. वयाच्या 19 व्या वर्षी शेफालीने काटा लगा ह्या गाण्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दरम्यान पोस्टमार्टमनंतर शेफालींचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले होते. यावेळी त्यांना नववधूसारखे सजवण्यात आले. लाल साडी नेसवून शेफालींना त्यांच्या कुटुंबीयांनी शेवटचा निरोप दिला. ओशिवारा स्मशानभूमीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.