
हिंदी मनोरंजन विश्वात ‘कांटा लागा’ या आयकॉनिक गाण्याने रातोरात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला यांचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला असला, तरी मुंबई पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले. शेफाली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेने बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.