
प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला यांचे शुक्रवारी रात्री वयाच्या 42व्या वर्षी अचानक निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या दुखद घटनेनंतर त्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षक शत्रुघ्न याने एका वृत्तवाहीनीशी बोलताना त्या रात्रीच्या घटनांचा धक्कादायक खुलासा केला. शेफाली यांच्या मृत्यूने बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.