
'काटा लगा' गाण्यामधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या अकाली निधनाने सगळ्यांना धक्का बसलाय. शेफालीने वयाच्या ४२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. कार्डियाक अरेस्टमुळे शेफालीचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मात्र तिच्या या अशा अचानक निधनाने तिची एक खूप मोठी इच्छा अपूर्णच राहिली. शेफालीला आई व्हायचं होतं. तिला एक गंभीर आजार होता. त्यामुळे ती बाळाला जन्म देऊ शकत नव्हती. मात्र तिला मूल दत्तक घ्यायचं होतं. तिने मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.