Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल जाणून घेऊयात ज्यानं अभिनेत्री रेखासोबत (Rekha) काम करुन सिनेसृष्टीत पदार्पण केलं, पण नंतर त्याच्यावर फ्लॉप अभिनेत्याचा टॅग लागला होता.
माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, रेखासोबत केला डेब्यू पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...
Shekhar sumansakal

Shekhar Suman: सिनेसृष्टीत अनेक कलाकार स्वप्ने घेऊन येतात. काही कलाकर सिनेसृष्टीतील त्यांच्या पदार्पणानंतर यशस्वी होऊन सुपरस्टार बनतात, तर काहीजण चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करण्यासाठी धडपडतात. अनेक कलाकारांच्या स्ट्रगल स्टोरीज प्रेक्षकांना माहित नसते. अशातच अशा एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल जाणून घेऊयात ज्यानं अभिनेत्री रेखासोबत (Rekha) काम करुन सिनेसृष्टीत पदार्पण केलं, पण त्याच्यावर फ्लॉप अभिनेत्याचा टॅग लागला होता.

रेखासोबत काम करुन बॉलिवूडमध्ये केली एन्ट्री

अभिनेते शेखर सुमन यांनी 1984 मध्ये 'उत्सव' या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात शेखर यांनी रेखासोबत काम केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन गिरीश कर्नाड यांनी केलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा शेखर सुमन आणि रेखा यांच्यातील इंटिमेट सीन्सची बरीच चर्चा झाली.

माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम

शेखर सुमन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'उत्सव' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्यांनी 'मानव हत्या' हा चित्रपट साइन केला होता, ज्याचे बजेट खूपच कमी होते. या चित्रपटात त्यांनी माधुरी दीक्षितसोबत काम केले होते. त्यावेळी माधुरी ही न्यूकमर होती. चित्रपटाचे बजेट कमी असल्यामुळे शेखर यांनी बाईकवर माधुरी दीक्षितला पिकअप आणि ड्रॉप करायचे काम केले होते.

फ्लॉप अभिनेत्याचा लागाला टॅग, मग टेलिव्हिजनमध्ये केलं काम

शेखर सुमन यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवात सुपरस्टार्सपासून केली आणि 1989 पर्यंत ते यशस्वी ठरले पण इतकी चांगली सुरुवात करूनही त्यांचे करिअर अपेक्षेप्रमाणे ग्रो झाले नाही. शेखर सुमनने बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट दिले आणि त्यानंतर ते टेलिव्हिजनकडे वळले. शेखर यांनी अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केलं आहे.

'हिरामंडी'मुळे चर्चेत

शेखर सुमन आणि त्यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी संजय लीला भन्साळीच्या 'हिरामंडी'मध्ये काम केलं आहे. या नेटफ्लिक्स वेब सिरीजमध्ये त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com