

SHEVGYACHYA SHENGA
ESAKAL
आ युष्याकडे बघताना मानवी मन आपली बेरीज-वजाबाकी करत असते. काय मिळाले, मिळवले, गमावले याचा आलेख मांडताना अस्वस्थही होत असते. त्यात साध्या सरळ माणसाचे प्रश्नही त्याच्या जगण्यासारखेच साधे असतात. वेगळ्या वाटेने संपत्ती कमावलेल्यांचे प्रश्न गुंतागुंतीचेच असतात. त्यांची अस्वस्थता टोकाची असते. अशाच सुधीर ससाणे (अविनाश नारकर) आणि विमल बर्वे (ऐश्वर्या नारकर) या व्यक्तिरेखांभोवती ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटकात गजेंद्र अहिरे यांनी गुंफली आहे.