
Entertainment News : सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजनवरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 5’ आपल्या प्रभावशाली परफॉर्मन्स आणि हृदयस्पर्शी गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या सीझनमध्ये आई आणि मुलांमधील नात्याचे सुंदर चित्रण करण्यात येत आहे. मात्र, येणारा एपिसोड एक पाऊल पुढे जात, वडिलांच्या नात्याला केंद्रस्थानी ठेवणार आहे. या भागात स्पर्धक अप्सराच्या परफॉर्मन्समुळे मंचावरील सर्वांना भावनिक करणारा क्षण अनुभवायला मिळणार आहे.