
मुलाखतकार - धनलक्ष्मी गावकर
गौरव कालुष्टेचा ‘इलू इलू’ हा चित्रपट मागील आठवड्यामध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्याने काम केले आहे. यापूर्वी त्याने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यानंतर त्याला हा चित्रपट करण्याची संधी मिळाली. आता त्याचे एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट येत आहेत. त्याची अभिनयाविषयीची आवड, पुढे कोणते प्रोजेक्ट्स हाती घेतले आणि मराठी सिनेसृष्टीतील त्याच्या भविष्यासंदर्भात काय योजना आहेत, याबाबत त्याच्याशी केलेली खास बातचीत.