प्रसिद्ध टिव्ही मालिका 'सीआयडी 2'ची सध्या जोरदार चर्चा होताना पहायला मिळत आहे. मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचा अभिनय करणारे शिवाजी साटम यांची शोमधून एक्झिट दाखवण्यात आली आहे. तसंच आता त्यांच्या जागेवर पार्थ समथान पहायला मिळणार आहे. सोनी टीव्हीने सुद्धा प्रद्युम्न याचा मृत्यू दाखवला आहे. दरम्यान आता दुसरीकडे शिवाजी साटम यांनी चकित करणारा खुलासा केला आहे.