
Marathi Entertainment News : वाराणसी येथे राहणाऱ्या डॉ. मंगला कपूर. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्यावर ॲसिड हल्ला होतो आणि त्यांचे संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त होते. खूप त्रास आणि वेदना त्यांना सहन करावी लागते. समाजाकडून त्यांना तुच्छतेची वागणूक मिळते. अशाही परिस्थितीमध्ये त्या मोठ्या जिद्दीने उभ्या राहतात आणि आपल्या जीवनाला वेगळा आयाम देतात. त्यांच्याच जीवनप्रवासाची कथा आणि व्यथा मांडणारा चित्रपट म्हणजे मंगला चित्रपट.