

Marathi Entertainment News : गेले अनेक दिवस मंगला या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. टीझरमध्ये शिवाली परबसह शशांक शेंडे, अलका कुबल, डॉ. संजीव कुमार पाटील, विशाल राठोड या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी ठरत आहे.