

shivani naik and amit rekhi
ESAKAL
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री शिवानी नाईक हिने आयपीएस अपर्णा बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांपैकी एक होती. या मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वीच शिवानीचा साखरपुडा पार पडला. शिवानीने अभिनेता अमित रेखी याच्या सोबत साखरपुडा केला. अमितने 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता त्यांनी त्यांचं रिलेशन ८ वर्ष लपवून का ठेवलं याबद्दल सांगितलं आहे.