ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! शेअर केले न पाहिलेले फोटो, कविता मेढेकर म्हणाल्या…

Shivani Rangole And Kavita Medhekar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी खास पोस्ट केली आहे.
akshara post for bhuvneshwari
akshara post for bhuvneshwari esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत असते. त्यातील सासू- सुनेची जोडीही चाहत्यांची आवडती आहे. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेत्री कविता लाड मुख्य भूमिकेत दिसतायत. भुवनेश्वरी नेहमीच अक्षराला त्रास देण्यासाठी निरनिराळे प्लॅन करताना दिसते. मालिकेत या दोघी एकमेकांच्या विरोधात असल्या तरी पडद्यामागे त्या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघींमध्ये खूप छान नातं आहे. आज भुवनेश्वरी म्हणजेच कविता यांच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने एक पोस्ट करत त्यांना खास शुभेच्छा दिल्यात. सोबतच त्यांच्यासोबतचे काही कधीही न पाहिलेले फोटोही शेअर केलेत.

akshara post for bhuvneshwari
वडिलांच्या निधनावर पहिल्यांदाच बोलली मलायका अरोरा; २ महिन्यांनी व्यक्त केलं दुःख, म्हणाली- जे झालं ते...

शिवानीने कविता यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिलं, 'सुंदर आणि सर्वांवर नेहमीच प्रेम करणाऱ्या माझ्या आयुष्यातील गोड व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! जे योग्य वाटतंय ते करा ही तुझी शिकवण आम्हाला खूप काही शिकवून जाते. ताई तुझ्याकडून आम्हाला कायमच प्रेरणा मिळते. आपल्याला भविष्यात सुद्धा अशाच नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळत राहू देत.' या पोस्टवर कविता यांनीही त्यावर कमेंट करत 'धन्यवाद शिवानी. लव्ह यू' असं म्हटलं आहे. त्या दोघी पडद्यामागे एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत हे यावरून दिसतं.

akshara post for bhuvneshwari
म्हणून 'काकस्पर्श' साठी टक्कल करायला तयार झाल्या सविता मालपेकर, मांजरेकरांचा एकच प्रश्न अन्

कविता यांनी ‘उंच माझा झोका’, ‘चार दिवस सासूचे’, ‘राधा ही बावरी’ या मालिकांमध्ये काम केलंय. तर शिवानीने देखील अनेक अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकली आहे. या दोघीही पहिल्यांदाच 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये एकत्र काम करताना दिसतायत.

akshara post for bhuvneshwari
साधूचा अवतार, हातात परशु... विकी कौशलच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून नेटकरी भारावले; काय आहे नाव?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com