'राजा राणीची ग जोडी' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेतील अभिनेता अंबर गणपुळेबरोबर ती लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती लग्नाच्या तयारीत अडकली आहे. दोघांच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. शिवानीचा मेहंदीसोहळा देखील पार पडला आहे. लाल रंगाच्या घागऱ्यात शिवानीची मेहंदी अधिकच खुलून दिसत आहे.