

SHIVANI SONAR
ESAKAL
छोट्या पडद्यावरून गेल्या काही वर्षात अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातलाच एक गाजणारा चेहरा म्हणजे शिवानी सोनार. शिवानीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. तिने 'राजा राणी ची गं जोडी' मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती आता 'तारिणी' मालिकेत दिसतेय. मराठी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी शिवानी कुठे काम करत होती याबद्दल एका पॉडकास्टमध्ये तिला विचारण्यात आलं. तेव्हा तिने सांगितलेलं उत्तर ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं.