
Marathi Entertainment News : महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 च्या धक्कादायक निकालानंतर संपूर्ण राज्यात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. विरोधकांनी ईव्हीएम मशीन आणि मतदान प्रक्रियेवरच शंका घेतली आहे. त्यातच माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) हे छोटस गाव चर्चेत आलंय तेथील गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे. या भागात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर (Uttam Jankar) आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) उभे होते. या गावातून उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना 843 तर राम सातपुते (Ram Satpute) यांना 1003 मते मिळाल्याचं समोर आलं.