
छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा आवडता विषय. संध्याकाळी आणि आता दुपारीही गृहिणी मालिका आवडीने पाहतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं मालिका हे प्रभावी माध्यम आहे. कलाकार याच मालिकांमधून घराघरात पोहोचतो. मात्र काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात तर काही मालिका लगेच प्रेक्षकांचा निरोप घेतात. मालिकांचं हे गणित अवलंबून असतं ते टीआरपी रेटिंगवर. आता गेल्या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.