
ज्या चित्रपटाचा ‘मूव्ही ऑफ द मिलेनियम’ म्हणून अभिमानाने गौरवले जाते तो ‘शोले’ चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शनाची पन्नास वर्षे पूर्ण करीत आहे. या चित्रपटाने भारतीय सिनेमांमध्ये स्वतःच्या एक बेंचमार्क निर्माण करून ठेवला आहे. अभतपूर्व अशी लोकप्रियता मिळाली. आज पन्नास वर्षे जरी झाली असली तरी ‘शोले’ला वगळून या माध्यमाची चर्चा करू शकत नाही. भारतीय सिनेमाची आर्थिक गणिते संपूर्णपणे बदलवून टाकणारा हा चित्रपट होता. हा सिनेमा मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये तब्बल पाच वर्षे मुक्कामाला होता. ‘शोले’चा प्रभाव आजही भारतीय सिनेमावर आणि समाजमाध्यमांवर कायम आहे. यानिमित्ताने आज १९७५ साली ‘शोले’या चित्रपटाला टक्कर देणारे त्या वर्षीचे इतर टॉप टेन चित्रपट कोणते होते, त्याचा थोडक्यात आढावा.