Ajanta Verul International Film Festivalsakal
Premier
Ajanta Verul International Film Festival :अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सव: मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी प्रवेश सुरू
Short Film: अकराव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी मराठवाड्यातील शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट लघुपटास २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह बक्षीस दिले जाईल.
छत्रपती संभाजीनगर : पुढील वर्षी होणाऱ्या अकराव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त मराठवाडास्तरीय शॉर्ट फिल्म (लघुपट) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील रहिवासी असलेल्या निर्माता आणि दिग्दर्शकांसाठी ही स्पर्धा असेल.

