
kus
esakal
ऊसतोड मजूर महिलांचे आरोग्य व त्यांचे जगणे मांडणाऱ्या 'कूस' या लघुपटाला राज्यस्तरीय उत्कृष्ट लघुपट म्हणून तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या लघुपटाची निर्मिती उचित मीडिया सर्व्हिसेसने केली असून, दिग्दर्शन व लेखन डॉ. ज्ञानेश्वर जाधवर यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या लघुपट महोत्सवाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आगीनफूल लघुपटास प्रथम, तर चंद्रलेखा लघुपटास द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत राज्यभरातून ३५० पेक्षा अधिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यातून कूस लघुपटाने तिसरा क्रमांक मिळवला.