
कॉमेडियन कपिल शर्माबद्दल एक मोठी धक्कादायक बातमी समोर येते आहे. कपिलच्या कॅनडा कॅफेमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कपिलचा हा कॅफे नुकताच उघडण्यात आला. तीन दिवसांपूर्वी या कॅफेचं उदघाटन झालं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक माणूस कॅफेच्या खिडक्यांवर गोळीबार करताना दिसत आहे. तो व्यक्ती एका कारमध्ये आहे आणि हा व्हिडिओही तिथून बनवला जात आहे.