

shreya bugde on husband
ESAKAL
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे सगळ्यांची आवडती आहे. तिने आपल्या हटके लकबीने हास्यविनोद करणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलंय. श्रेया तिच्या आयुष्याबद्दलही अनेकदा मनमोकळेपणाने बोलताना दिसते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या पतीबद्दल सांगितलं आहे. श्रेयाने निखिल सेठ याच्याशी लग्न केलंय. त्यांच्या नात्याला आता १२ वर्ष होणार आहेत. आता मुलाखतीत तिचं पतीसोबतचं नातं कसं आहे याबद्दल तिने सांगितलंय.