अभिनेता सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रेया पिळगावकर ही वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. अनेक वेब सीरिजमध्ये तीने काम केलंय मिर्झापूर, गिल्टी माइंट सारख्या सीरिजमध्ये सुद्धा तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या श्रेयाची छलकपट ही क्राइम सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये श्रेया एका महिला पोलिसेच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.