

the india story
esakal
सध्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि घातक रसायनांच्या विरोधात धाडी सत्र सुरू आहे, आणि लोकांच्या आरोग्याचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशाच वेळी या ज्वलंत प्रश्नावर परखड भाष्य करणारा चेतन डीके दिग्दर्शित 'द इंडिया स्टोरी' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा केवळ एक सिनेमा नसून आपल्या जीवनशैलीवर आणि यंत्रणेवर उपस्थित केलेला एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल अभिनीत हा कोर्टरूम ड्रामा एका अशा संवेदनशील विषयाला हात घालणारा आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या थेट जगण्याशी जोडलेला आहे.