
SHREYAS TALPADE PRARTHANA BEHERE
ESAKAL
छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या मालिकांमध्ये अनेक कलाकार दिसतात. मात्र काही मालिका आणि त्यातील कलाकार कायमचे प्रेक्षकांच्या मनावर कोरले जातात. मालिका संपली तरीही हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात राहतात. अशीच एक जोडी म्हणजे श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांची. हे दोघे 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत दिसले होते. त्यात या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.