Shriya Pilgaonkar: सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी मुलीला दत्तक घेतलंय? अखेर श्रियानं सोडलं मौन, म्हणाली, "माझं जन्म प्रमाणपत्र..."

Shriya Pilgaonkar: श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) ही सध्या तिच्या ब्रोकन न्यूज-2 (Broken News 2) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
Shriya Pilgaonkar
Shriya Pilgaonkaresakal

Shriya Pilgaonkar: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांची मुलगी श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) ही सध्या तिच्या ब्रोकन न्यूज-2 (Broken News 2) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या वेब सीरिजचा दुसरा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच श्रिया या वेब सीरिजचं प्रमोशन करत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत श्रियानं तिच्याबाबत पसरवल्या गेलेल्या खोट्या बातम्यांबाबत सांगितलं.

काय म्हणाली श्रिया?

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत श्रियाला तिच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या खोट्या बातमीबद्दल विचारण्यात आलं. यावेळी ती म्हणाली, “एक लेख होता ज्यामध्ये मला दत्तक घेण्यात आले आहे, असं लिहिलं होतं. हे खरं नाहीये, मला दत्तक घेतलेलं नाहीये. माझ्या पालकांनी मला दत्तक घेतलं आहे, अशा बातम्या समोर येत असतात पण हे पूर्णपणे असत्य आहे.”

पुढे श्रिया म्हणाली, "ही अशी गोष्ट आहे, ज्याचे स्पष्टीकरण देणे हे आवश्यक नाहीये कारण मी माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी इंस्टाग्रामवर माझे जन्म प्रमाणपत्र शेअर करु शकत नाही. पण हो, हे मनोरंजक होते कारण ते खरे नाहीये, परंतु त्याशिवाय, माझ्याबद्दल इतर कोणत्याही खोट्या बातम्या पसरलेल्या नाहीत."

Shriya Pilgaonkar
Shriya Pilgaonkar: 'चित्रपटात काम मिळावं म्हणून मी कधीही...' महागुरुंची मुलगी बोलून गेली!

श्रियानं शाहरुखसोबत शेअर केली स्क्रिन

सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर हिने शाहरुख खानसोबत ‘फॅन’ या चित्रपटात स्क्रिन शेअर केली. तिनं भुवन बामसोबत 'ताजा खबर' या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

कधी रिलीज होणार ब्रोकन न्यूज?

श्रियाच्या ब्रोकन न्यूज या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या वेब सीरिजचा दुसरा सीझन 3 मे रोजी रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये श्रियासोबतच सोनाली बेंद्रे आणि जयदीप अहलावत यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज झी-5 वर रिलीज प्रेक्षक पाहू शकणार आहेत.

Shriya Pilgaonkar
Jitendra Kumar Dry Day: जितू भैयाचा नवीन सिनेमा 'ड्राय डे'ची घोषणा, या तारखेपासून भेटीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com