

shruti marathe
esakal
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर गाजलेली मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. तिने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी एक त्यांची जोडी आहे. ते दोघे नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. एकमेकांवरील प्रेमही व्यक्त करतात. अशातच आता गौरवने श्रुतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात श्रुती जेवताना दिसतेय. मात्र ती चक्क ग्लोव्हज घालून जेवताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.