
shubha khote
esakal
मराठी सिनेसृष्टीत अनेक भाऊबहिणीच्या जोड्या आहेत. त्यातील एक गाजलेली जोडी म्हणजे विजू खोटे आणि शुभा खोटे. या दोन्ही भाऊ बहिणीने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावलं. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे हे दोघे कायम एकमेकांच्या मागे भक्कम आधार म्हणून उभे राहिले. विजू यांची 'शोले' चित्रपटातली कालियाची भूमिका प्रचंड गाजली. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. ते ७८ वर्षाचे होते. एकुलत्या एक भावाला गमावल्यानंतर शुभा यांना कोणाचाही आधार राहिला नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं भाऊ गमावल्याचं दुःख बोलून दाखवलं आहे.