झी मराठी वाहिनीवरील 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या घराघरात पोहचले आहे. दरम्यान आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या लाखात एक आमचा दादा मालिकेतील अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्याने त्याच्या मैत्रिणीसोबत सारखपुडा केलाय. तसंच त्याने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय.