

SHUBHANGI ATRE
ESAKAL
'भाभी जी घर पर हैं' ही मालिका घराघरात गाजली. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडलं. मात्र (Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेतील शुभांगी अत्रेचा (Shubhangi Atre) प्रवास आता 'अंगूरी भाभी' (Angoori Bhabhi) म्हणून थांबला आहे. जवळपास १० वर्षे या शोचा भाग राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्रीने आता आपला 'पॅकअप' केला आहे. तिने या मालिकेचा निरोप घेतलाय, कारण निर्माते आता मूळ अंगूरी म्हणजेच शिल्पा शिंदेला (Shilpa Shinde) परत मालिकेत आणत आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी शुभांगीला अश्रू अनावर झालेत.