
नुकतीच भारत सरकारने ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केलीये. यात अभिनेता शाहरुख खानने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकलाय तर त्याच्यासोबत विक्रांत मेसीने देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलंय. तर अभिनेत्री राणी मुखर्जीला 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकलाय. इतर चित्रपटांच्या गर्दीत काही मराठी चित्रपटांनीही राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवलीये. 'श्यामची आई', 'नाळ २' आणि 'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेत.