Aditi Rao Hydari - Siddharth: "आमच्या लग्नाचा निर्णय...", अदितीशी लग्नाच्या चर्चांवर सिद्धार्थने सोडलं मौन

अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या चर्चांवर सिद्धार्थने मौन सोडले आहे.
aditi rao hydari and siddharth
Aditi Rao Hydari And Siddharthsakal
Updated on

Aditi Rao Hydari And Siddharth: बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी गुपचूप साखरपुडा उरकला.

२७ मार्चला पार पडलेल्या या साखरपुड्याची चर्चा अजूनही सुरु असलेली पाहायला मिळतेय आणि आता त्यांच्या चाहत्यांमध्ये ही जोडी लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकताही सगळ्यांना आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ‘गलाट्टा गोल्डन स्टार्स’ सोहळ्यात सिद्धार्थने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. लग्न केव्हा करणार या प्रश्नाचं उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला कि, अनेक लोकांचा असा समज झालाय की, आम्ही गुपचूप साखरपुडा केला. पण, फक्त कुटुंबाबरोबर एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि गुपचूप एखादा कार्यक्रम करणं यात खूप मोठा फरक आहे.

aditi rao hydari and siddharth
Dhanush-Aishwarya Rajinikanth Divorce : धनुष अन् ऐश्वर्या रजनीकांतच्या नात्याला ब्रेक; घटस्फोटासाठी अर्ज दाखल

ज्या लोकांना आम्ही साखरपुड्याला बोलावलं नाही त्यांना असं वाटतं की, यामागे नक्की काहीतरी सिक्रेट आहे. परंतु, जे लोक तिथे उपस्थित होते त्यांना माहितीये की, हा कार्यक्रम खूप खाजगी होता. आमचे जवळचे कुटुंबीय आणि काही नातेवाईक त्यावेळी उपस्थित होते, अस सिद्धार्थ म्हणाला.

यापुढे तो म्हणाला,"अदितीने मला होकार देण्यासाठी खूप वेळ घेतला हे प्रश्न खूप आता लांब राहिले आहे आहेत. मी खूप दिवस विचार करत होतो कि ती होकार देईल कि नाही? पण सुदैवाने ती हो म्हणाली. आता आम्ही लग्न कधी करणार याचा निर्णय आमच्या घरातील मोठी लोकं घेतील.

aditi rao hydari and siddharth
Akshay Kumar: "मी असा ब्रेकअप्समधून सावरलो'',अक्षयने केला खुलासा

त्यांचा निर्णय आम्हा दोघांसाठी महत्त्वाचा असेल. ही काही चित्रपटाच्या शूटिंगची तारीख नाही की, मी ठरवेन तसं होईल. मोठ्या लोकांमध्ये चर्चा झाल्यावर तेच निर्णय घेतील." असं म्हणत त्याने त्यांच्या लग्नाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.

अदिती आणि सिद्धार्थने 'महासमुद्रम' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमादरम्यान त्यांची ओळख झाली. ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

आता ही जोडी लग्न कधी करणार हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत हे नक्की. अदितीची लवकरच 'हिरामंडी: द डायमंड बाजार' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com