

SONALEE KULKARNI AND SIDDHARTH JADHAV
ESAKAL
इंडस्ट्रीमध्ये होणारी मैत्री खरी नसते असं म्हणतात. मात्र मराठी इंडस्ट्रीतले असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी हे खोटं ठरवलंय. अनेक कलाकारांनी त्यांची त्यांची मैत्री जपलीये. मात्र कधी कधी शुल्लक कारणावरून मैत्री तुटते. किंवा अबोला धरला जातो. असाच अबोला होता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव यांच्यामध्ये. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलंय. तर सिद्धार्थदेखील अनेक खचता खात इथपर्यंत पोहोचलाय. मात्र तब्बल १० वर्ष हे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. त्याचं कारण अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलेलं.