

siddharth jadhav wife trupti akkalwar
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने आपल्या अभिनयाने आणि आपल्या जिद्दीने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावलंय. मात्र जेव्हा तो कुणीही नव्हता तेव्हा त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती ती त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार. त्याचा संसार संभाळण्यापासून त्याच्या डेट संभाळण्यापर्यंत सगळं काही तृप्ती करत होती. मात्र मध्यंतरी सिद्धार्थ आणि तृप्तीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं समोर आलं होतं. ते दोघे वेगळे राहत असल्याच्या देखील बातम्या होत्या. आता तृप्तीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यात काय बिनसलेलं याबद्दल सांगितलं आहे.