
‘सैयारा’च्या यशानंतर रोमँटिक कथानक पुन्हा प्रेक्षकांना आकर्षित करत असून, त्याच पार्श्वभूमीवर ‘परम सुंदरी’ प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात दिल्लीचा श्रीमंत पण अपयशी तरुण परम (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि दक्षिणेतील आत्मविश्वासी सुंदरी (जान्हवी कपूर) यांची हलकीफुलकी प्रेमकथा दाखवली आहे.
परम आपल्या वडिलांकडून (संजय कपूर) शेवटची संधी मिळाल्यानंतर सोलमेट अॅपमध्ये गुंतवणूक करतो आणि तिथून त्याच्या जीवनाची खरी लढाई सुरू होते.