

Bollywood Singer Interview : आजच्या युवा पिढीच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या गायकांमध्ये अरमान मलिक हे नाव अग्रस्थानी आहे. आपल्या मोहक आवाजाने आणि विविध भाषांमध्ये गायनाच्या कौशल्याने त्याने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बाराहून अधिक भाषांमध्ये गाणी गाणारा हा तरुण गायक आजच्या तरुणाईचा आवाज बनला आहे. नुकत्याच झालेल्या बूमबॉक्स या संगीत महोत्सवानिमित्त आणि त्याच्या संगीतमय प्रवासाविषयी भाष्य केलं.