

Savani Ravindra Released Her Music Label First Song
esakal
Marathi Entertainment News : मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून संगीतप्रेमींसमोर आली आहे. तिच्या आवाजातील गोडवा, अभिव्यक्तीची ताकद आणि प्रत्येक गाण्यातून जाणवणारी भावना यामुळे सावनीने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे आणि आता हाच सुरेल प्रवास पुढे नेत ती स्वतःचं म्युझिक लेबल घेऊन सज्ज झाली आहे. 'सावनी रेकॉर्डझ्' या नावाने तिने आपल्या म्युझिक लेबलची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात केली.