
Marathi Entertainment News : सिंघम हा आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला सिनेमा. 2011 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले. या सिनेमातील अनेक सीन्स लोकप्रिय ठरले. यातीलच एक सीन म्हणजे शिवा आणि सिंघमचा जिथे सिंघम शिवाला पट्टयाने खूप मारतो पण शिवा मार खात असतानाही छेडत असतो. अभिनेते अशोक समर्थ यांनी या सीनमागचा किस्सा शेअर केला.