
Bollywood Entertainment News : ‘लाल सिंग चड्ढा’च्या माफक प्रतिसादानंतर आणि काही काळाच्या विश्रांतीनंतर आमिर खान पुन्हा एकदा आपल्या शैलीत मोठ्या पडद्यावर परतले आहेत. त्यांच्या नवीन चित्रपट ‘सितारे जमीन पर’ द्वारे त्यांनी केवळ सशक्त पुनरागमन केलं नाही, तर हेही दाखवून दिलं की ते आजही भारतीय सिनेमातील सर्वात धाडसी आणि सच्चे कथाकथन करणाऱ्यांपैकी एक आहेत.