

मराठमोळ्या अभिनेत्री स्मिता जयकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. 'रहना है तेरे दिल मे', 'सरफरोश', 'हम आपके दिल मे रहते हैं', 'हम दिल दे चुके सनम' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून स्मिता प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यांनी मराठी मालिकाविश्व गाजवलं. सध्या स्मिता त्यांच्या मुलाखतीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यात त्यांनी अनेक हिंदी कलाकारांसोबतचे किस्से सांगितले आहेत. ज्यात रणबीरसोबतची पहिली भेटही सांगितलीये.