'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'मध्ये दिसणार स्मृती इराणी, झेड प्लस सिक्युरिटीमध्ये साकारणार तुलसीची भूमिका, मानधन ऐकून थक्क व्हाल!
Smriti Irani's Comeback in Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी ' ही प्रचंड गाजली. 2000मध्ये भेटीला आलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांना भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेमुळे स्मृती इराणी घराघरात पोहचली.
एकता कपूरने 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' या मालिकेची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात मालिकेबाबत उत्सुकता लागली आहे. अशातच माहितीनुसार असा दावा केला जातोय की, स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय सुद्धा या सीजन 2 मध्ये पुन्हा पहायला मिळणार आहे.