
Entertainment News : ‘आश्रम’ वेबसीरिजमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री त्रिधा चौधरी आता एका नवीन चित्रपटात दिसणार आहे. ‘सो लॉन्ग व्हॅली’ या क्राईम थ्रिलर हिंदी चित्रपटात तिच्यासोबत आकांक्षा पुरी, मान सिंग आणि विक्रम कोचर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.