Ek Don Teen Chaar Movie : सम्या सायलीच्या लफडयाचा साक्षीदार ; 'या' सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं मराठीत पदार्पण

Nipun & Vaidehi New Movie : निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'एक दोन तीन चार' या सिनेमातून एक सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करतोय.
Ek Don Teen Chaar Movie  Poster
Ek Don Teen Chaar Movie PosterEsakal

Marathi Movie 2024 : सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. सध्या अशाच लवकरच रिलीज होणाऱ्या सिनेमाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. हा सिनेमा आहे 'एक दोन तीन चार'. एक क्युट लव्हस्टोरी आणि प्रेग्नेंसीमध्ये एक किंवा जुळं नाहीतर चार बाळं होणार असल्याचं कळल्यावर उडणारी त्रेधातिरपीट आणि पुढे येणाऱ्या अडचणी यावर भाष्य करणारा या सिनेमात वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमातून एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे 'सोनावणे वहिनी' या पात्रामुळे प्रसिद्ध असलेला करण सोनावणे. विनोदी रील्स शेअर करणाऱ्या करणच्या अनेक रील्स सोशल मीडियावर गाजल्या आहेत आणि आता करण पहिल्यांदाच एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एक दोन तीन चार या सिनेमात तो महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकताच त्याच्या भूमिकेविषयी सांगणारा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

Ek Don Teen Chaar Movie  Poster
Ek Do Teen Char: क्युट लव्हस्टोरीत झालाय गोंधळ फार, 'या' दिवशी रिलीज होणार एक दोन तीन चार !

जियो स्टुडिओजने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये निपुण आणि करणच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळतेय. करण या सिनेमात निपुण साकारत असलेल्या सम्या या पात्राच्या खास मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. सम्या आणि सायलीच्या लव्हस्टोरीचा साक्षीदार आणि सम्या-सायलीला चार मुलं होणार असल्याची बातमी कळल्यावर धक्का बसतो असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. "एक, दोन, तीन, चार, सम्या सायलीच्या लफड्याचा हाच खरा साक्षीदार.!! " असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.

पहा प्रोमो :

वरुण नार्वेकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून निपुण आणि वैदेहीबरोबर मृणाल कुलकर्णी,हृषीकेश जोशी, सतीश आळेकर, शैला संतोष यांच्याही मुख्य भूमिका आहेत. रणजित गुगळे आणि ज्योती देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून १९ जुलै २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Ek Don Teen Chaar Movie  Poster
Ek Do Teen Chaar Teaser: सम्या-सायलीच्या क्युट लव्हस्टोरीत येणार ट्विस्ट; "एक दोन तीन चार"चा टीझर पाहिलात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com