
Faizan Ansari vs Tanya Mittal
ESakal
बिग बॉस १९ ची स्पर्धक तान्या मित्तल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचे चर्चेत येण्याचे कारण गेम किंवा शो नाही तर तिच्यावरील फसवणुकीचे आरोप आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी ग्वाल्हेरमधील पोलीस सार्वजनिक सुनावणीत तान्या मित्तलविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत फैजानने तान्याविरुद्ध अनेक गंभीर आरोप केले आहेत.